Wednesday, 15 November 2017

ओव्याचा काढा

ओव्याचा काढा  घेतल्याने सर्दी खोकला तर बरा होतोच, शिवाय पचनक्रिया ही सुधारते. हा काढा बनविण्याकरिता पाव कप गूळ, अर्धा कप पाणी, एक लहान चमचा ओवा, अर्धा लहान चमचा हळद, एक लवंग आणि पाच काळी मिरी एका भांड्यामध्ये एकत्र करून दहा मिनिटे उकळून घ्यावे. हा काढा गाळून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार मुलाला एक – एक चमचा पाजावा.

0 comments:

Post a Comment