Sunday, 22 October 2017

जायफळ

                            जायफळ

              वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ (शास्त्रीय नाव: Myristica, मायरिस्टिका ; इंग्लिश: Nutmeg, नटमेग ;) हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणार्याय अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे 'मायरिस्टिका फ्रॅग्रन्स' होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात.
     
                जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बी होय. याचा आकार अंडाकृती असून ते २० ते ३० मि.मी. (०.८ ते १ इंच) लांब आणि १५ ते १८ मि.मी. (०.६ ते ०.७ इंच)रुंदीचे असते. त्याचे वाळल्यावर वजन ५ ते ७ ग्रॅम (०.२ ते ०.४ औंस) असते. जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली, लालसर रंगाची साल होय. जायफळाचे झाड लावल्यापासून ७ ते ९ वर्षांनी त्याला पहिल्यांदा फळे धरतात व २० वर्षांनंतर झाड पूर्ण जोमाने उत्पादन देऊ लागते. मसाल्यांमध्ये सहसा जायफळाची पूड वापरली जाते. एकाच झाडापासून दोन मसाल्याचे पदार्थ निर्मिणारे हे एकमेव झाड आहे.
याव्यतिरिक्त तैलार्क, तैलीय रेसिने, जायफळाचा स्निग्धांश (बटर) इत्यादी व्यापारी उत्पादने या झाडापासून मिळतात.

                  जायफळ किसणीवर सहज किसता येते.
मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ही जायफळाची सर्वसाधारण जात इंडोनेशियातील बांदा बेटांव्यतिरिक्त, मलेशियातील पेनांग बेटावर तसेच कॅरिबिअन भागातील ग्रनाडा येथे आढळून येते. दक्षिण भारतात केरळामध्ये ही जात जोपासली जाते. जायफळाच्या इतर प्रमुख जाती न्यू गिनी येथील पापुअन नटमेग मायरिस्टिका अर्जेंटिया आणि भारतातील बाँबे नटमेग मायरिस्टिका मलाबारिका या होत.
जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो. जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हाल लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि आजूबाबूला लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहर्या वरील डाग नाहीसे होतात.

             संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे, चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो.

         पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे २-३ थेंब साखरेत मिसळून खावेत.
दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही जायफळाचा उपयोग होतो.
सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळविण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते.
बाळाला कफ झाला असताना किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो.
बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे हे प्रत्येक आईसाठी कठिण काम असते. वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळावे. दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते.
 जायफळ किसून गरम भांडय़ात थोडं गरम करावं. त्यात तेवढाच गूळ घालावा. त्याच्या लहान लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या डायरियासारख्या आजारात घेतल्यास लवकर आराम पडतो.
जायफळाची पूड लिंबाच्या रसात घोळवून त्याची पेस्ट चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. ही पेस्ट एक उत्तम ब्लीच समजलं जातं.
पॅरालिसिसच्या रुग्णांची जीभ जड होते, तेव्हा त्या रुग्णांच्या तोंडात जायफळ चघळायला दिल्याने रुग्णांना अतिशय उपयोगी ठरतं.
निद्रानाश होत असल्यास जायफळाची पूड तुपात घोळवून ती कपाळावर लावल्याने झोप येते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.
अस्थम्याच्या झटक्यावर जायपत्री अतिशय गुणकारी ठरते. एक ग्रॅम जायपत्री मधात घोळवून दिवसातून ४-५ वेळा खाल्ल्याने अस्थम्याच्या रुग्णांना बराच आराम पडतो.
             जायपत्री तेलाच्या सेवनाने लहान मुलांची भूक वाढते आणि वजन कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.
अति तहान लागत असल्यास नैसर्गिक चहात (हर्बल टी)मध्ये ३ ग्रॅम जायपत्री टाकून तो चहा प्यावा. यामुळे लगेच आराम पडतो.
जायपत्री तेल आणि नारळाचं तेल दोन्ही एकत्र करून त्याने टाळूला मालीश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची वाढ होते.
आयरायटिससारख्या आजारात जायपत्रीचं तेल लावल्यास त्वरित आराम पडतो.
बद्धकोष्ठतेवरही जायपत्री तेलाचा बाह्योपचार केला जातो.
             त्वचेवर इसब असल्यास त्यावर जायपत्री तेल अतिशय गुणकारी ठरतं.
आज आपण जायफळ बद्दल आणखी थोडस जास्त जाणून घेऊया ...दोन वर्ष पूर्वी आम्ही केरळ ला गेलो होतो तिथून मसाले आणले होते सगळे संपले पण जायफळ अजून शिलक आहेत....त्याचा आपण जास्त वापर करत नाही म्हणून असेल कदाचित . म्हणूनच जिज्ञासा म्हणून Google वर सर्च केलं तर जायफळाचे बरेच उपयोग आहेत आपण फक्त गोड केले की त्यात टाकतो पण आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्यात आपण जायफळाची वापर करू शकतो काही इथे शेअर करतो.  तुम्हालाही या व्यतिरिक्त काही उपयोग  माहित असतील तर नक्की सांगा.
--------------------------------------------------
           भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्या  मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर कोणत्याही गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘The Journal of Ethno pharmacology’ च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते.

                     जायफळाचे फायदे
जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच तुम्ही शांत व दीर्घकाळ झोपता . मग पहा तुम्हांला अजून किती तास झोपेची गरज आहे.
कसा कराल जायफळाचा आहारात समावेश

1. जायफळ – मधाचे मिश्रण:
जायफळाची चिमूटभर पावडर चमचाभर मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किमान १५ मिनिटे आधी घ्यावे. मधात हे ‘५’ पदार्थ मिसळा आणि तुमचे वजन घटवा

2. जायफळाचा काढा:
प्राचीन काळापासून शांत झोप येण्यासाठी जायफळाचा वापर केला जात असे. जायफळाची पूड करून कपभर पाण्यात मिसळून उकळा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. रात्रीच्या जेवणानंतर हा चहा तुम्हांला आरामदायी झोप येण्यासाठी हा चहा नक्कीच मदत करेल.

3. जायफळयुक्त दूध:
रात्री झोपण्यापूर्वी तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर जायफळ मिसळा. दुधामुळे सेरोटोनीन आणि मेलाटोनीनचे प्रमाण वाढते. या दोन्हींमुळे तुम्हांला आरामदायी झोप मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुधात जायफळ पूड घालून पिणे फायद्याचे आहे.

4. जायफळ आणि आवळ्याचा रस:
ग्लासभर आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर जायफळ पूड मिसळल्यास पचन सुधारते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आरामदायी झोप येण्यास मदत होते. वजन घटवणारी १५ हेल्दी घरगुती ड्रिंक्स !

5. जेवणात जायफळ:
रात्री झोपण्यापूर्वी चहा,कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यात आवर्जून जायफळ पूड मिसळा. तसेच रात्रीच्या जेवणात सूप, कढी किंवा दह्याचा समावेश करत असल्यास त्यात जायफळाची पूड जरूर मिसळा.

6.जायफळ फेस पॅक:
जायफळ दुधात उगाळून रोज 15 दिवस चेहेऱ्यावर लावले तर pimple डाग डोळ्या खालील काळे वर्तुळे सगळे जातील आणि नितळ चेहरा होईल मात्र जायफळ उगळूनच लावावे.

7. जायफळ पावडर:
तुम्हांला एखाद्या पेयात किंवा जेवणाच्या पदार्थात जायफळ पूड मिसळणे आवडत नसल्यास चिमुटभर पूड पाण्यासोबत घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी हा प्रयोग केल्यास निद्रानाशाची समस्या कमी होण्यास मदत होईल.

                     खबरदारीचा उपाय:
निद्रानाशावर जायफळ परिणामकारक असले तरीही त्याचा अतिवापर टाळा. चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ पूड खाऊ नका. जायफळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास पित्त, मळमळणं, अस्वस्थ वाटणं, तोंड सुकणं, सतत तहान लागणं असा समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच काही औषधांसोबत जायफळ खाल्ल्यास दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक
संकलक : प्रमोद तांबे

0 comments:

Post a Comment